इन्व्हेस्टमेंट

------------------

आपण जगतो आहोत त्या काळाचा अत्यंत आवडीचा विषय “गुंतवणूक”. तशी ती पिढ्यांनपिढ्या चालत आलेली परंपरा आहे म्हणा.. पण तरीही ती प्रत्येक पिढी साठी त्या त्या वेळेच्या संदर्भाप्रमाणे वेगवेगळी. 

क्वालिटी, रिटर्न्स या महत्वाच्या मुद्यांचा अभ्यास करुन मगच गुंतवणूक करायला हवी, योग्य वेळं येताच गुंतवणूक करायला हवी, गुंतवणुकीचे फायदे, प्रत्येक वयातील व्यक्तिने गुंतवणूक केलीच पाहिजे, गुंतवणूक योग्य ठिकाणी च करायला हवी,कमी वयात गुंतवणूक केल्यास पुढे चांगले रिटर्न मिळतात, काटकसर करुन जास्तीच करायला हवी, मॉडरेट करायला हवी, इतर खर्च बघता थोडी च करावी,वगैरे वगैरे या आणि अश्या अनेक चर्चा आणि हा विषय सगळ्यांच्या परिचयाच्या. 


कसली बर करतात हि गुंतवणूक?? 


पैश्यांची, स्थावरसंपत्तीची.. बरोबर. पण मला आणखी एक प्रश्न पडतो तो म्हणजे माणसा माणसांमध्ये ही गुंतवणूक करता येते का? 

म्हणजे बघा ना, एकत्र राहणे, काम करणे, गप्पा मारणे, वेळ देणे ही गुंतवणूक च नव्हे का?


रोजच्या आयुष्यात आपण मानव आणखी एका प्रकारची गुंतवणूक करतो; ती म्हणजे 

माणसांमधली गुंतवणूक.. 

आता तुम्ही म्हणाल हे काय.. ? 

तर ते अस की.. 

जसं पैसे कुठे ? किती? कधी? कश्यात? किती कालावधी साठी गुंतवायला हवे या बाबींचा विचार करतो त्याच प्रकारे माणसा माणसांमध्ये सुद्धा आपण वेळ किती? कुणाला? ? ही गुंतवणुकच करत असतो.

ही इन्वेस्टमेंट फायद्या तोट्यात मोजत जरी नसलो तरीही ती आपण प्रत्येक जण हिशोबा शिवाय करत असतो. तिही कुणाबाबतीत अमाप असते, कुणा बाबतीत अगदीचं कंजूषपणे केलेली असते. 😉

पैश्यांमधल्या, संपत्ती च्या इन्वेस्टमेंट चा हिशोब नफा किंवा तोटा या परिमाणांवर घेऊ शकतो. परंतु एखादया व्यक्ती मधल्या गुंतवणुकीला ही मोजमाप लावता येत नसतात. 


पालक आणि मूल

मित्र/मैत्रिणी

नवरा/ बायको

मालक/नोकर

ऑफिसर/ सहकारी

ही झाली संबंधांची नावे पण आहेत तर ही सगळी माणस च!! 

प्रत्येकाला लेबल वेगळं असेलही पण त्या खाली दोन व्यक्ती च एकमेकांशी जोडल्या गेल्यात. 

गम्मत बघा कशी ते आपण नित्यनियमाने घर, ऑफिस या सगळ्या ठिकाणी एकमेकांच्या सहवासात वावरत असतो वेग वेगळ्या लेबल्स खाली. त्यां सोबत वेळेची देवाण घेवाण, शब्दांची देवाण घेवाण पर्यायाने भावनांची,विचारांची देवाणघेवाण ही दैनंदिन जीवनात होतच असते मात्र त्या कडे गुंतवणूक या दृष्टिकोनातून आपण बघत नाही. ते बरच आहे म्हणा नाहीतर त्यातही हिशेब करुन नफा शोधायला लागू.. असो! 

तर माझ्या मताप्रमाणे आपली ही गुंतवणूक इतर कुठल्याही गुंतवणुकी पेक्षा अमूल्य असते. तर ती कशी?  


“एक व्यक्ती” संपर्कात किंवा आयुष्यात येणं मग तो कुठेही घरात, ऑफिसात.. 

आयुष्यात येण म्हणजे त्या व्यक्तीला आपल्या विचारांत स्थान देण. एखादी व्यक्ती आयुष्यात येते म्हणजे काय? तर त्या व्यक्तिमत्वाला आपल्या विचारांमध्ये आपण स्थानापण्ण करतो. 😊

तुम्ही म्हणाल एवढा कुठे विचार असतो का.. अशी कित्येक लोक दिवसभरात,कितीतरी वर्षात नेहेमीच भेटत असतात अश्या किती लोकांमधे गुंतवणूक होईल मग? हो तर असतेच ती.. कितीही कमी वेळेसाठी का असू दे, एखादया व्यक्ती ला भेटलांत, बोललात, त्या वेळात त्या व्यक्ती बद्दल एक तरी  बरा, वाईट विचार आपल्या विचारांत येतो किंवा येऊन जातो. याच प्रकारे ज्या व्यक्तींसोबत आयुष्यातला बराचं काळ आपण घालवतो किंवा असतो तेव्हा त्यांच्यातल्या बऱ्या, वाईट विचारांमधले 

तर आपण प्रमुख गुंतवणुकदार असतो.


लावलेल्या नात्यानुसार त्या त्या व्यक्ती बद्दलच्या कल्पना बदलतं जातात. 

आपण तेच असतो. भावनांचे गाठोडे.. त्या गाठोड्यातील एक अमुक भावना या प्रमाणात या व्यक्तीला, दुसऱ्या व्यक्तीला ती तेवढी त्या प्रमाणात.. अशी एक एक भावांची गुंतवणूक आपण प्रत्येक नात्याच्या काल्पनिक वलयानुसार तयार करत राहतो, बदलत राहतो. सहकारी कर्मचाऱ्या साठी वेगळी, शिपाई साठी वेगळी,मित्रासाठी वेगळी, वडिलांसाठी वेगळी, आईंसाठी वेगळी, बायको, सासू, जावई अशी प्रत्येका साठी कुठली कमी कुठली जास्त, कुठली बरी कुठली वाईट..हे ही आपलं ठरलेलं असतं. 

गम्मत कशी आहे बघा..

एकूणच बॉटमलाइन आपण पाहिली तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती बद्दल “भाव” तयार करुन त्यानुसार स्वतः च्या विचारांमध्ये, कल्पनांमध्ये त्याला सामावून घेतो व त्या व्यक्ती मध्ये भावनांची,विचारांची गुंतवणूक करतो आणि करत राहतो. 

त्या गुंतवणुकीचे रिटर्न म्हणजे आपण घेतलेल्या निर्णयांमध्ये , आपल्या रोजच्या जगण्यामधे त्या पार्टिक्युलर व्यक्तिच्या दोन्ही चांगल्या आणि वाईट विचारांचा नकळत पणे सहभाग असतो. 


हां ही गुंतवणूक करतोय ती त्या प्रत्येक व्यक्ती च्या व्यक्तिमत्वा प्रमाणे वेगळी. ती कशी? 


त्या त्या व्यक्तिमत्त्वाचा औरा, त्याची विचारांची सकसता, कोणत्या प्रकारचे एक्स्ट्रॅक्ट त्याच्या विचारांतून तो काढतो,सकारात्मकता, नकारत्मकता, अस्थिरता,निर्णय क्षमता, त्याचे वैयक्तिक निकष, त्याची स्वतःची इतरांबद्दलची विश्वासर्ह्यता या आणि अश्या इतर सगळ्या गुणवत्ते प्रमाणे. 

ही गुंतवणूक ती कशी? 

आपण व ती व्यक्ती यांच्यात देवाण घेवाण लक्षात घेता त्यात वेळेची देवाण घेवाण, शब्दांची,पर्यायाने भावनांची देवाणघेवाण ही दैनंदिन जीवनात होत असते. आणि तिच आपली त्या व्यक्तिमत्त्वात असलेली गुंतवणूक होय!! 


आपण कोणात कशी आणि किती गुणवत्तेची गुंतवणूक करतोय; या वर आपल्या विचारांची पर्यायाने आपल्या जगण्याची गुणवत्ता दिवसागणिक ठरत जाते. 

 निरिक्षण केले तर आपल्याही लक्षात येईल. 

आई-वडिल, आदर्श, मित्र, शिक्षक यांच्याकडणं मिळालेल्या काही विचारांच्या, वागण्याच्या पध्दती नकळत पणे आत्मसात केल्या जातात आणि तसे आपण घडत असतो.

विचारांच्या सूक्ष्म पातळीवर एखादया व्यक्ती मधील गुंतवणूक कधीतरी जगण्याला नकळतपणे नवं वळण देत असते. त्यामुळे विचारांची व वेळेची गुंतवणूक ही नेहेमी डोळस पणे च असायला हवी यासाठी मी आग्रही असते.

हे एक प्रायोगिक निरीक्षण म्हणूया हव तर. 

माणस च एकमेकांना पुढे नेतात. कधी त्यांच्या सहकार्याने, कधी त्यांनी निवडलेल्या मार्गांमुळे, महत्वाचे म्हणजे त्यांच्या विचारांमुळे. 

 त्यामुळेच आपल्या विचारात कश्या प्रकारच्या व्यक्तिमत्त्वाचे विचार आपण सामावून घेतोय किंवा कुणा बद्दल करतोय हे ही जागरूकपणे तपासायला हवे कारण याच इन्वेस्टमेंट प्रमाणे आपल्या जगण्याची क्वालिटी ठरत असते. 

रोजच्या जगण्यात हा दृष्टिकोन ठेवला तर उगाच होणारा राग राग, विचारतील नाकारत्मकता बाजुला करणे सोप्पे होईल. मी तर म्हणते बसून एकदा इन्वेस्टीगेट च करा आणि नकळतपणे केलेल्या गुंतवणुकीचे रिटर्न्स जिकडून आलंय तिकडे द्या साभार परत पाठवून म्हणजे तुम्ही आणि तुमचा मेंदू नवीन, तुमच्या चॉइस ची अशी उत्कृष्ट क्वालिटी ची इन्वेस्टमेंट करण्यासाठी तयार व्हाल. त्याच प्रमाणे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे ही गुंतवणूकदार असतीलच.. त्यांनाही चांगले रिटर्न्स मिळू दे..! ☺️

                                                                

                                                                  - अयन

Comments