Posts

Showing posts from March, 2023
Image
       इन्व्हेस्टमेंट ------------------ आपण जगतो आहोत त्या काळाचा अत्यंत आवडीचा विषय “गुंतवणूक”. तशी ती पिढ्यांनपिढ्या चालत आलेली परंपरा आहे म्हणा.. पण तरीही ती प्रत्येक पिढी साठी त्या त्या वेळेच्या संदर्भाप्रमाणे वेगवेगळी.  क्वालिटी, रिटर्न्स या महत्वाच्या मुद्यांचा अभ्यास करुन मगच गुंतवणूक करायला हवी, योग्य वेळं येताच गुंतवणूक करायला हवी, गुंतवणुकीचे फायदे, प्रत्येक वयातील व्यक्तिने गुंतवणूक केलीच पाहिजे, गुंतवणूक योग्य ठिकाणी च करायला हवी,कमी वयात गुंतवणूक केल्यास पुढे चांगले रिटर्न मिळतात, काटकसर करुन जास्तीच करायला हवी, मॉडरेट करायला हवी, इतर खर्च बघता थोडी च करावी,वगैरे वगैरे या आणि अश्या अनेक चर्चा आणि हा विषय सगळ्यांच्या परिचयाच्या.  कसली बर करतात हि गुंतवणूक??  पैश्यांची, स्थावरसंपत्तीची.. बरोबर. पण मला आणखी एक प्रश्न पडतो तो म्हणजे माणसा माणसांमध्ये ही गुंतवणूक करता येते का?  म्हणजे बघा ना, एकत्र राहणे, काम करणे, गप्पा मारणे, वेळ देणे ही गुंतवणूक च नव्हे का? रोजच्या आयुष्यात आपण मानव आणखी एका प्रकारची गुंतवणूक करतो; ती म्हणजे  माणस...